"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

झाप  हे महाराष्ट्र राज्यातील पालघर  जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. राजा भूपती यांच्या नावावरून भुपत गड हे नाव रूढ झाले आहे.जव्हार संस्थांची पहिली  "राजधानी" म्हणून भुपतगड ओळखला जात असे. भुपतगडाची उंची साधारणत: १६६ फुट असून वरचा पठारी भाग हा ६ ते ७ एकर मध्ये आहे.गडावर पाणी अडवण्यासाठी पठारावर जोडटाक्यांचा समूह आहे. व तलाव आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २९७५  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ४ , अंगणवाडी केंद्रे ५  व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.

1. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, नाचणी, वरई  ही प्रमुख पिके घेतली जातात.

2. झाप  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झाप  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे.  झाप गावाला आर.आर.आबा सुंदर गाव पुरस्कार सन २०२३/२४ मध्ये तालुक्यामध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त होवून गाव बक्षीस रक्कम रु १० लक्ष   रुपये  प्राप्त झाले  आहे

3. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १०  सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

4.    झाप  गाव आज जाव्हार  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

झाप  हे गाव जव्हा  तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ८५८.७२ हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३  वार्ड आहेत. एकूण ६८७  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २९७५  आहे.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ  प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.

लोकजीवन

झाप  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून  पावसाळ्यामध्ये भात, नाचणी वरई पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा आदिवासी संस्कृती जतन करणारा बोहाडा  गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

झाप  च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

 संस्कृती परंपरा

झाप  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

ग्रामपंचायत प्रशासन

क्र

नाव

पद

श्री.एकनाथ पांडू दरोडा

सरपंच

श्री. सखाराम धर्मा वड

उपसरपंच

श्री.महेंद्र जयराम गवारी  

सदस्य

श्री.विलास सदू बागुल

सदस्य

श्री युवराज महादू वाघ

सदस्य

सौ कल्पना श्रावण वातास  

सदस्य

सौ. लता सदाशिव राथड

सदस्य

सौ शितल गणेश मांगात

सदस्य

सौ वंदना एकनाथ दरोडा

सदस्य

१०

सौ अनिता जगन खानझोडे

सदस्य

११

श्री अमोल शिवराम भोये  

सचिव

संस्कृती व परंपरा

झाप गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात. गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात. यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


422
2308
1174
1189

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo